Ad will apear here
Next
राशी आणि स्वभावांच्या गमतीजमती


सिंह रास ही राजयोगी रास म्हणतात. सिंहेची मंडळी थोडी आक्रमक, हुकूमशाही वृत्तीची वगैरे खरं असलं, तरी त्यांचा मूळ स्वभाव हा अत्यंत शांतताप्रिय, सलोखा ठेवणारा आणि शिस्तप्रिय असतो. सिंह मंडळी कधीच भांडकुदळ आणि कुचाळक्या करणारी नसतात. त्यांचं आत्ममग्न असणं अनेकांना अहंकार वाटतो... सिंह मंडळींचा थोडा प्रॉब्लेम म्हणजे ते स्वतःला सर्वज्ञ समजतात (असतात ७५ टक्केच; पण आव आणतात १०० टक्के). त्यामुळे त्यांच्या हुकमी विषयात ते ब्रह्मदेवाच्या बापाचंही एकत नाहीत. म्हणून सिंहेची मंडळी कधीकधी नावडती होतात. सतत इतरांनी माझं ऐकावं हा अट्टाहास घातक ठरतो.

शांतता, डिसिप्लिन आणि सुव्यवस्था ठेवण्याच्या अट्टाहासापायी जवळची माणसं भरडली जातात. सिंह मंडळीची दुसरी गंमत म्हणजे त्यांना सतत कोणी तरी सोबत लागतो. कोणी तरी होयबा म्हणणारा, एखादा असिस्टंट, अगदीच काही नाही तर गप्पा मारायला तरी त्यांना कंपनी हवीच असते. सिंह मंडळी उत्कृष्ट प्लॅनर्स असतात, समाजात आणि कुटुंबात शिस्त, सिस्टीम असावी यासाठी असणारी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी असली, तरी ते स्वतःहून इकडची काडी तिकडे करत नाहीत... पण इकडची काडी तिकडे कशी करावी? ती काडी नंतर नीट कशी ठेवायची? काडीचे सदुपयोग वगैरे वगैरे त्यांना सगळं माहीत असतं. योजना असते; पण काडी इकडून तिकडे ठेवायला दुसरं कोणी तरी हवं असतं... अशी गंमत असते.

(काही सन्माननीय कष्टाळू आणि स्वावलंबी अपवाद असू शकतात.)
........


उत्सुकता आणि चौकसपणा याबाबतीत कर्क आणि कन्या राशीच्या मंडळींचा हात कोणीच धरू शकत नाही. ज्या गोष्टींशी आपला अर्थाअर्थी कधीच संबंध नव्हता, आत्ताही नाही आणि भविष्यातही कधी नसेल त्या गोष्टींबद्दलही यांना प्रचंड चौकशा असतात; पण असं का? आणि तसंच का नाही? याबाबत त्यांना एकशेबहात्तर प्रश्न पडलेले असतात. डिटेलिंग, उपप्रश्न आणि ट्रॅक बदलणं हे यांचं वैशिष्ट्य... बरेचदा यांचं विषयमहासागरी भरकटलेलं जहाज मूळ ट्रॅकवर आणण्याची जबाबदारी आपलीच असते...

दोन्ही राशींची मंडळी गॉसिपबाजी करण्यात आघाडीवर असतात. यांची गॉसिप्स तशी Harmless असतात आणि तासभर गॉसिपबाजी झाल्यावर कानाच्या पाळ्यांना हात लावून ‘शांतं पापं...शांतं पापं... खरं म्हणजे आपल्याला काय करायचै नै का? ज्याचं त्याचं नशीब’ असंही म्हणतात. 

तुमच्या ग्रुपमध्ये कर्क किंवा कन्येचं कोणी असेल, तर गावात आणि परिसरातल्या इत्थंभूत खबरा असणार हे १०० टक्के... थोडी पिन मारली की सुरू होईल ‘खरं म्हणजे आपल्याला काही नाही गं... ज्याचं त्याचं नशीब गं, पण तुला कानिटकरांच्या शुभीचं समजलं ना?’.... मग पुढे तासभर कानिटकरांच्या शुभीचा डिव्होर्स, ॲलिमनी पुराण सुरू... आणि शेवटी ‘जाऊ दे बाई... आपल्याला काय करायच्चै नै का?’ असा शेवट 

(काही सन्माननीय अपवाद)

.........
मकर राशीची माणसं (स्त्री-पुरुष दोघेही) ही खऱ्या अर्थाने कर्मयोगी असतात. जेवण करण्यापासून सेक्सपर्यंत आणि नोकरी-उद्योगापासून व्यायामापर्यंत प्रत्येक गोष्ट ते नशीबात जणू काही हे लिहिलं आहे आणि ते आपल्याला निमूटपणे करणं भाग आहे अशाच भावनेने करतात. मकर मंडळी कोणत्याही गोष्टीत उत्स्फूर्तता, आनंद आणि उत्साह दाखवत का नाहीत, हे एक कोडंच आहे. त्यांच्या बऱ्याच कामांमध्ये ‘दुसऱ्याचं भलं व्हावं’ असाही एक गमतीशीर भाग असतो. ‘जगलो उपकारापुरता’ असं त्रयस्थपणे जगतात. 

माझा मकरेचा एक मित्र जणू काही बारवाल्या मालकाला थोडेफार पैसे मिळावेत म्हणून रोज नाईन्टी मारत असावा आणि पितरांना मुक्ती मिळावी म्हणून त्यानं मुलं जन्माला घातली असावीत असा मला दाट संशय आहे.

- सचिन मधुकर परांजपे (पालघर)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HUZJCU
Similar Posts
धनू, मकर, कुंभ राशीला साडेसाती; काही उपाय, उपासना (उत्तरार्ध) शुक्रवार, दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी सकाळी नऊ वाजून ५३ मिनिटांनी शनिमहाराज मकरेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे त्या वेळेपासून वृश्चिकेची साडेसाती संपून कुंभेची साडेसाती सुरू होते आहे. अशा रीतीने आता धनू, मकर आणि कुंभ या तीन राशींना साडेसाती सुरू असणार आहे. त्या निमित्ताने, पालघरचे ज्योतिष मार्गदर्शक सचिन
धनू, मकर, कुंभ राशीला साडेसाती; काही उपाय, उपासना (पूर्वार्ध) शुक्रवार, दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी सकाळी नऊ वाजून ५३ मिनिटांनी शनिमहाराज मकरेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे त्या वेळेपासून वृश्चिकेची साडेसाती संपून कुंभेची साडेसाती सुरू होते आहे. अशा रीतीने आता धनू, मकर आणि कुंभ या तीन राशींना साडेसाती सुरू असणार आहे. त्या निमित्ताने, पालघरचे ज्योतिष मार्गदर्शक सचिन
अडीचकी म्हणजे काय रे भाऊ? साडेसाती ही संकल्पना आता आपल्यापैकी अनेकांना परिचयाची आहेच; पण ‘अडीचकी’ म्हणजे एक्झॅक्टली काय, हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. शनिमहाराज प्रत्येक राशीत साधारणपणे त्यांच्या मंद गतीनुसार अडीच वर्षे भ्रमण करून मग पुढील राशीत प्रवेश करत असतात. त्यांचे हे राशीभ्रमण जेव्हा तुमच्या अगोदरच्या+तुमच्या+तुमच्या नंतरच्या अशा तीन राशीत मिळून (२
नऊ फेब्रुवारीच्या मकर षट्ग्रहीचा परिणाम सर्व राशींवर नऊ फेब्रुवारीच्या मकर षट्ग्रहीचा परिणाम साधारणपणे ३० मार्चपर्यंत असू शकतो. मकर राशीत रवी, शनी, गुरू, बुध, शुक्र आणि चंद्र एकत्र येत आहेत. मकर रास कालपुरुषाच्या कुंडलीत दशम (कर्म) स्थानी येते आहे. त्यामुळे एकंदरीत व्यवहारिक पातळीवर कोणत्याही कारणाने उद्योगधंदे, व्यापार यावर थोडा निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language